मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

द फ्लाईंग फॅमिली : एक असं कुटुंब जे तीन पिढ्यांपासून आकाशात भरारी घेतंय...

2 मिनिट वाचन
शेअर करा:
द फ्लाईंग फॅमिली : एक असं कुटुंब जे तीन पिढ्यांपासून आकाशात भरारी घेतंय...

मंडळी, तुमच्या नजरेसमोर अशी काही कुटूंबं नक्कीच असतील जिथे पती पत्नी एकाच हुद्यावर, किंवा वडील आणि त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा एकाच हुद्यावर आहेत. पण तुम्ही कुठं असं कुटुंब पाहिलंय का, की ज्याच्या तीन पिढ्यांमधील सर्व सदस्य एकाच हुद्यावर काम करतायत? नाही? मग भेटा या भसीन मंडळींना...

दिल्लीच्या या भसीन फॅमिलीतल्या प्रत्येक सदस्यानं जणू पायलट बनण्याचा दृढनिश्चयच केलाय. या कुटुंबाचा प्रवास सुरू होतो कप्तान जयदेव भसीन यांच्यापासून. १९५४ च्या काळात भारतात असणार्‍या काही मोजक्या पायलट्समध्ये जयदेव यांचा समावेश होतो. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव, कप्तान रोहित भसीन आणि त्यांची पत्नी निवेदिता जैन हे दोघेही वैमानिकच आहेत. विशेष म्हणजे १९८४ साली अवघ्या २० वर्षे वयात निवेदिता यांना इंडियन एअरलाईन्सकडून नियुक्तीपत्र मिळालं होत. वयाच्या २६व्या वर्षी एका अपत्याची आई असणार्‍या निवेदिता या जेट प्लेन चालवणार्‍या जगातील पहिल्या महिला वैमानिक बनल्या. 
निवेदिता जैन यांनी जगातील सर्वात मोठं विमान एअरबस A300  या विमानाचं कमांडरपद भूषवलंय,  तसंच त्यांनी पहिल्यावहिल्या अॉल वुमेन क्रू फ्लाईटवर को-पायलटची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळलीये.

स्त्रोत

साहजिकच रोहित आणि निवेदिता यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या मुलांनाही आकर्षित केलं. म्हणूनच आज या कुटुंबाची तिसरी पिढी, म्हणजेच रोहित आणि निवेदिता यांचा मुलगा रोहन आणि मुलगी निहारिका हे दोघेही वैमानिकच बनलेत!! रोहन हा एअर इंडिया मध्ये गेली १० वर्षे कमांडर म्हणून, तर त्याची बहिण निहारिकाही ४ वर्षांपासून इंडीगोमध्ये वैमानिक म्हणुन काम करतीये. नुकतंच निहारिकानेही आपल्या आईप्रमाणे एअरबस A320 वर कमांड केलंय तर रोहननेही बोईंग ७७७ चं यशस्वी उड्डाण मारून आपल्या कुटुंबाची गगनभरारी कायम राखली आहे.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलतिकीट नाही, पासपोर्ट नाही, तरी विमानाने गाठलं न्यूयॉर्क; दोन पोरांचे अजब साहस!१९८५ मध्ये डब्लिनच्या दोन लहान मुलांनी तिकीट आणि पासपोर्ट नसताना लंडनहून न्यूयॉर्कपर्यंत एअर इंडियाच्या विमानातून केलेला अविश्वसनीय प्रवास.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

चामड्यावर नक्षी कोरणारा मुलगा कसा बनला भारताचा 'सिल्व्हर किंग'?
लाइफस्टाइल

चामड्यावर नक्षी कोरणारा मुलगा कसा बनला भारताचा 'सिल्व्हर किंग'?

एका चर्मकाराचा मुलगा ते जगातील सर्वात मौल्यवान चांदीचे कारागीर, ओमरसी मावजी यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या 'OM' शिक्क्याच्या एका भांड्याची किंमत आज लाखात आहे.

२३ ऑक्टोबर, २०२६

साखरेचा 'कडू' डोस: जगाला साखर वाटणारा भारत स्वतःच का झाला ग्राहक?
लाइफस्टाइल

साखरेचा 'कडू' डोस: जगाला साखर वाटणारा भारत स्वतःच का झाला ग्राहक?

उसावरील रोगराई, अतिवृष्टी आणि इथेनॉल उत्पादनामुळे जगात सर्वाधिक साखर पिकवणाऱ्या भारताला साखरेची आयात का करावी लागली?

२४ ऑगस्ट, २०२६

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?
लाइफस्टाइल

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?

भारतीयांच्या सोन्यावर बंदी घालणाऱ्या १९६८ च्या गोल्ड कंट्रोल ॲक्टचा अजब इतिहास आणि त्यामुळे सुरू झालेली तस्करी.

१७ ऑगस्ट, २०२६

तेजसचा नवा अवतार; आता 'स्प्राइट'च्या नावावर धावणार पहिली ब्रँडेड रेल्वे
लाइफस्टाइल

तेजसचा नवा अवतार; आता 'स्प्राइट'च्या नावावर धावणार पहिली ब्रँडेड रेल्वे

आयआरसीटीसीने महसूल वाढवण्यासाठी तेजस एक्सप्रेसच्या ब्रँडिंगचा अनोखा करार कोका-कोला कंपनीशी केला आहे.

१४ ऑगस्ट, २०२६

बटाट्याच्या 'फ्लेक्स'ने घेतली ५०० कोटींची झेप; भारताच्या कृषी निर्यातीत नवा धमाका!
लाइफस्टाइल

बटाट्याच्या 'फ्लेक्स'ने घेतली ५०० कोटींची झेप; भारताच्या कृषी निर्यातीत नवा धमाका!

जपानपासून इंडोनेशियापर्यंत भारतीय बटाट्याच्या फ्लेक्सला मोठी मागणी. कृषी निर्यातीतील या ५०० कोटींच्या नव्या क्रांतीची गोष्ट.

१८ जुलै, २०२६