मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

मुंबई मेट्रोचे मार्ग समजून घ्या या रंगांच्या मदतीने, तुम्हांला कुठून-कुठे जावे लागेल ते ही पाहून घ्या

3 मिनिट वाचन
शेअर करा:
मुंबई मेट्रोचे मार्ग समजून घ्या या रंगांच्या मदतीने, तुम्हांला कुठून-कुठे जावे लागेल ते ही पाहून घ्या

मुंबईतआणि ठाण्यात जवळजवळ सगळीकडेच मेट्रोचं काम चालू आहे. नागरिकांना अजूनही समजलेलं नाही की मुंबई मेट्रोचं जाळं नेमकं कसं असेल. नुकतंच ‘एमएमआरडीए’ ने (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) मेट्रोच्या कामाचा आढावा देणारा एक नकाशा जाहीर केलं आहे. या नकाशावरून  मुंबई मेट्रोच्या संपूर्ण जाळ्याची माहिती मिळते.

या नकाशात पहिल्यांदाच मुंबई मेट्रोच्या मार्गीकांना रंग देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, दहिसर आणि डी एन नगर भागांना जोडणाऱ्या मार्गिकेला पिवळा रंग, तर अंधेरी आणि मीरा-भाईंदर भागांना जोडणाऱ्या मार्गिकेला लाल रंग देण्यात आला आहे.

मुंबई मेट्रोचे मार्ग समजून घ्या या रंगांच्या मदतीने, तुम्हांला कुठून-कुठे जावे लागेल ते ही पाहून घ्या – चित्र 1

मुंबई मेट्रोच्या मार्गिका आणि त्यांना एकमेकांशी जोडणाऱ्या मार्गिका यांचं  एक संपूर्ण चित्र या फोटोत आपण पाहू शकतो. हा फोटो झूम करण्याचा प्रयत्न करू नका. कारण, डिजिटल स्वरुपात उपलब्ध असलेला फोटो कमी दर्जाचा आहे. म्हणूनच बोभाटा तुम्हाला प्रत्येक मार्गिका आणि त्याचा खास रंग सांगणार आहे. चला तर पाहूया.

मुंबई मेट्रोचे मार्ग समजून घ्या या रंगांच्या मदतीने, तुम्हांला कुठून-कुठे जावे लागेल ते ही पाहून घ्या – चित्र 2

निळा रंग –  लाईन-१

वर्सोवा ते घाटकोपर

 

आकाशी निळा रंग – लाईन-३

कफ परेड - बीकेसी -  आरे कॉलनी

मुंबई मेट्रोचे मार्ग समजून घ्या या रंगांच्या मदतीने, तुम्हांला कुठून-कुठे जावे लागेल ते ही पाहून घ्या – चित्र 3

हिरवा रंग – लाईन-४ + लाईन ४A + लाईन १० + लाईन ११

लाईन ४ : भक्ती  पार्क वडाळा ते  कासारवडवली

लाईन ४A :  कासारवडवली ते गायमुख

लाईन-१० : गायमुख ते शिवाजी चौक

लाईन ११ : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

 

नारंगी रंग – लाईन-५ + लाईन १२

लाईन ५ : ठाणे – भिवंडी – कल्याण

लाईन १२ : कल्याण ते तळोजा

मुंबई मेट्रोचे मार्ग समजून घ्या या रंगांच्या मदतीने, तुम्हांला कुठून-कुठे जावे लागेल ते ही पाहून घ्या – चित्र 4

गुलाबी रंग – लाईन-६

लोखंडवाला – जोगेश्वरी – कांजुरमार्ग

 

लाल रंग – लाईन-७ + लाईन-७A + लाईन-९

लाईन-७ : दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व)

लाईन-७A : अंधेरी (पूर्व) ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

लाईन-९ : दहिसर (पूर्व) – मीरा भाईंदर

मुंबई मेट्रोचे मार्ग समजून घ्या या रंगांच्या मदतीने, तुम्हांला कुठून-कुठे जावे लागेल ते ही पाहून घ्या – चित्र 5

सुवर्ण रंग -  लाईन-८

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

 

जांभळा रंग – लाईन १३

शिवाजी चौक ते विरार

मुंबई मेट्रोचे मार्ग समजून घ्या या रंगांच्या मदतीने, तुम्हांला कुठून-कुठे जावे लागेल ते ही पाहून घ्या – चित्र 6

किरमिजी तांबडा रंग – लाईन-१४

विक्रोळी – कांजुरमार्ग – बदलापूर

 

या यादीत सर्वच मार्गिका आलेल्या नाहीत. मुंबई मेट्रोच्या एकूण १६ मार्गिका असणार आहेत. यातील काही तयार झाल्या आहेत तर काही तयार होणार आहेत. याबद्दल सविस्तर माहिती देणारा आमचा हा लेख नक्की वाचा.

 

मुंबई-नव्यामुंबईच्या १६ मेट्रो कुठून-कुठेपर्यंत-कोणती स्टेशन्स सगळी माहिती एका ठिकाणी!!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

आधुनिक मुंबईचे खऱ्या अर्थाने शिल्पकार: 'नाना' शंकरशेठ आणि त्यांचं उत्तुंग कार्य
लाइफस्टाइल

आधुनिक मुंबईचे खऱ्या अर्थाने शिल्पकार: 'नाना' शंकरशेठ आणि त्यांचं उत्तुंग कार्य

मुंबईला आधुनिक रूप देणारे द्रष्टे समाजसुधारक जगन्नाथ 'नाना' शंकरशेठ यांच्या बहुमूल्य योगदानाचा घेतलेला ऐतिहासिक आढावा.

३१ जुलै, २०२६

आता पावसाचा सट्टा खेळू या? 'रेन मुंबई' आणि नशिबाचा पाऊस!
लाइफस्टाइल

आता पावसाचा सट्टा खेळू या? 'रेन मुंबई' आणि नशिबाचा पाऊस!

एनसीडीईएक्सने मुंबईतील पावसावर आधारित देशातील पहिला पावसाचा वायदा बाजार सुरू केला आहे. जाणून घ्या हा सट्टा नक्की कसा चालतो.

२ जुलै, २०२६

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ
लाइफस्टाइल

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ

१९५७ मध्ये व्हिक्टोरिया डॉकवर ३०० तोळे सोन्याची तस्करी पकडणारे मुंबई कस्टम्सचे कर्तव्यदक्ष अधिकारी बापू लक्ष्मण लामखडे यांची शौर्यकथा.

२ जुलै, २०२६

मुंबईचे काळीज: व्हिक्टोरिया टर्मिनसच्या ऐतिहासिक प्रवासाला १३९ वर्षे पूर्ण
लाइफस्टाइल

मुंबईचे काळीज: व्हिक्टोरिया टर्मिनसच्या ऐतिहासिक प्रवासाला १३९ वर्षे पूर्ण

बोरीबंदर ते व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आजचे सीएसएमटी; मुंबईच्या या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाचा १३९ वर्षांचा गौरवशाली प्रवास.

२० जून, २०२६

रेषेचा जादूगार: के. के. हेब्बर यांच्या कुंचल्याची जागतिक भरारी!
लाइफस्टाइल

रेषेचा जादूगार: के. के. हेब्बर यांच्या कुंचल्याची जागतिक भरारी!

भारतीय लोककला आणि पाश्चात्य तंत्राचा मिलाफ साधत 'सिंगिंग लाईन्स'द्वारे जागतिक कीर्ती मिळवणारे प्रख्यात चित्रकार के. के. हेब्बर.

१५ जून, २०२६

चुरमुऱ्यांच्या दोन राजधान्या: कोलकात्याची झालमुरी की मुंबईची भेळ?
लाइफस्टाइल

चुरमुऱ्यांच्या दोन राजधान्या: कोलकात्याची झालमुरी की मुंबईची भेळ?

कोलकात्याची झणझणीत झालमुरी आणि मुंबईची चटपटीत भेळ; या दोन लोकप्रिय स्ट्रीट फूडचा इतिहास आणि चवींची रंजक तुलना.

११ मे, २०२६