मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

खिश्यात पैसे नसल्याने त्याने पोलिसांची गाडी मागवली....हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
खिश्यात पैसे नसल्याने त्याने पोलिसांची गाडी मागवली....हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच !!

राव ते ‘ठाय ठाय’चं प्रकरण आठवतंय का ? अहो ते नाय का, बंदुकीतल्या गोळ्या संपल्या म्हणून युपीच्या का पोलिसाने ठाय ठाय आवाज काढून चोरांना घाबरवलं होतं. हो तेच ते. उत्तर प्रदेशच्या पोलिसांची अशीच अजब प्रकरणं असतात. आता कालचंच बघा ना.

काल उत्तर प्रदेश पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होत होता. व्हिडीओतल्या तरुणाला उझारी ते गुंनौर जायचं होतं. साधारण माणूस बस पकडून जाईल, पण याने १०० क्रमांकावर फोन करून पोलीसांना बोलावलं आणि फ्री राईड मागितली. पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा.

मंडळी, या जन्टलमनकडे प्रवासासाठी पैसे नव्हते म्हणून त्याने चक्क पोलिसांना फोन लावला. त्याचं असं म्हणन आहे की पोलिसांनीच त्याला सोडायला हवं, कारण पोलिसांची गाडी एक सरकारी गाडी आहे. महत्वाचं म्हणजे त्याच्याकडे बससाठी तर पैसेच नाहीत. असलं काही कोणी बडबडत असेल तर आपण विचारतो की “नशा करून आलायस का”. पोलिसांनी हाच प्रश्न त्याला विचारला, तर त्यावर त्याचं उत्तर होतं “मी नशा नाही करत, लहानपणापासून फक्त चिलम पितो.”  

पुढे काय झालं हे या दुसऱ्या व्हिडीओ मध्ये पाहा.

मंडळी, अशा नमुन्याला बघून पण पोलिसांनी धीर दाखवला त्यासाठी त्यांचं कौतुकच आहे. या मुलाची विशेष तारीफ यासाठी की अशी हिम्मत दाखवायला गुरदा लागतो. आता तो चिलम पिऊन सगळं बडबडत होता ही वेगळी गोष्ट !!

मंडळी, तुम्हाला काय वाटतं या ‘फक्त चिलम पिणाऱ्या’ जन्टलमनबद्दल. कमेंट करायला विसरू नका !!

 

आणखी वाचा :

बंदूक बंद पडल्यावर या पोलिसाने ते केलं जे आजवर कोणत्याही पोलिसाने केलं नव्हतं !!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

सावधान! तुमच्या बँक खात्याचा 'खेचर' म्हणून वापर तर होत नाहीये ना?
लाइफस्टाइल

सावधान! तुमच्या बँक खात्याचा 'खेचर' म्हणून वापर तर होत नाहीये ना?

सायबर गुन्हेगार तुमचे बँक खाते 'मनी लाँड्रिंग'साठी वापरू शकतात. 'म्यूल' बनून तुरुंगात जाण्यापेक्षा सावध राहा.

१६ फेब्रुवारी, २०२६