मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

आरपीएफ जवानाने प्रवाशाला मरणाच्या दाढेतून खेचून आणलं...पाहा हा व्हिडीओ!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
आरपीएफ जवानाने प्रवाशाला मरणाच्या दाढेतून खेचून आणलं...पाहा हा व्हिडीओ!!

मंडळी, रेल्वेतील गर्दी जसजसी वाढत आहे तसतसे अपघाताचे प्रमाण पण वाढत आहे. एवढ्या गर्दीत मदतीला उभे राहणारे पण कमी असतात कारण प्रत्येकजण स्वतःच्या धावपळीत असतो. अशावेळी जर स्थानिक पोलीस मदत करत असतील तर ती मोठी गोष्ट असते!! तमिळनाडूत एक अशीच घटना घडली आहे. एका पोलीसाने एका प्रवाशाला मरणाच्या दारातून खेचून आणलं आहे.

आरपीएफ जवानाने प्रवाशाला मरणाच्या दाढेतून खेचून आणलं...पाहा हा व्हिडीओ!! – चित्र 1

तर झाल असं, की तमिळनाडुच्या कोइम्बतुर रेल्वे स्टेशनवर एक माणुस चालत्या रेल्वेत चढत होता. रेल्वेचा वेग वाढल्याने त्याचा तोल गेला आणि तो ट्रॅकखाली सापडनार तेवढ्यात एका आरपीएफ अधिकाऱ्याने हे बघितलं आणि क्षणाचाही उशीर न करता त्याला एका हाताने पकडून रेल्वेत ढकललं.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्या पोलीसाचं सगळीकडे कौतुक होत आहे. त्या पोलीसाचं नाव पी वी जयन आहे. त्या दिवशी जयन यांना त्या स्टेशनवर काम देण्यात आलं होतं. जेव्हा त्यांनी प्रवाशाचा तोल जाताना बघितलं तेव्हा त्यांनी धाव घेऊन त्याला वाचवलं. जऱ त्यांनी ऐनवेळी चपळाई दाखवली नसती तर कदाचित त्या प्रवाशाचा जीव गेला असता!!

या कामासाठी जयन यांना रोख पैसे आणि मेरीट सर्टिफिकेट आलं आहे.

 

लेखक : वैभव पाटील

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

त्याला डोळ्यांनी दिसत नव्हतं, पण डोळ्यासमोर कंपनीचं भविष्य दिसत होतं!
लाइफस्टाइल

त्याला डोळ्यांनी दिसत नव्हतं, पण डोळ्यासमोर कंपनीचं भविष्य दिसत होतं!

१९५९ मध्ये दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या बीएमडब्ल्यू कंपनीला हर्बर्ट क्वांट यांनी स्वतःची संपत्ती पणाला लावून कसे सावरले, याची रंजक कथा.

१२ सप्टेंबर, २०२६

३४ कोटींचा 'ब्लड मनी' आणि २० वर्षांचा वनवास; अब्दुल रहीम अखेर मायदेशी परतला!
लाइफस्टाइल

३४ कोटींचा 'ब्लड मनी' आणि २० वर्षांचा वनवास; अब्दुल रहीम अखेर मायदेशी परतला!

सौदी अरेबियात फाशीची शिक्षा सुनावलेल्या अब्दुल रहीमची ३४ कोटींच्या 'ब्लड मनी'मुळे सुटका झाली. माणुसकीच्या या अभूतपूर्व गोष्टीचा आढावा.

२९ मे, २०२६

माणुसकीचा जपानी 'समुराई': सुगिहारांच्या व्हिसाची गोष्ट आज का महत्त्वाची आहे?
लाइफस्टाइल

माणुसकीचा जपानी 'समुराई': सुगिहारांच्या व्हिसाची गोष्ट आज का महत्त्वाची आहे?

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्वतःच्या करिअरची पर्वा न करता ६,००० ज्यूंचे प्राण वाचवणाऱ्या जपानी मुत्सद्दी चिउने सुगिहारा यांची ही प्रेरणादायी कथा.

११ मे, २०२६