मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

मुंबई मधल्या या हॉटेल्स मध्ये १३ वा मजलाच नाही...कारण वाचून धक्का बसेल !!

3 मिनिट वाचन
शेअर करा:
मुंबई मधल्या या हॉटेल्स मध्ये १३ वा मजलाच नाही...कारण वाचून धक्का बसेल !!

अंधश्रद्धा पाळू नका हे कितीही ओरडून सांगितलं तरी अंधश्रद्धा आजही समाजात घट्ट आहे. मंडळी साधं उदाहरण आहे. मांजर आडवी गेली म्हणून अनेकजण रस्ता बदलतात. त्यातही जर मांजर काळी असेल तर मग बघायलाच नको. आता काही लोकांना हे माहित असतं की ही एक अंधश्रद्धा आहे पण तरीही आतील मन कधीच हे स्वीकार करत नाही.

आता हेच बघा ना, मुंबई मधील काही हॉटेल्स मध्ये १३ वा मजलाच नाही. हे हॉटेल्सही साधेसुधे नाही बरं का अगदी फाईव्ह स्टार आहेत !!

 

या अंधश्रद्धेमागील कारण काय ?

स्रोत

याचं कारण म्हणजे १३ क्रमांक सैतानाशी जोडला गेला असल्याने तो अशुभ मानला जातो. हा १३ क्रमांक जर शुक्रवारी असेल तर तो अजून जास्त अशुभ होतो. या १३ नंबरच्या भीतीला “ट्रिस्कायडेकाफोबीया” म्हणतात.

मुंबई मधल्या या ‘स्काय स्क्रीपर्स’ची उंची ३० मजल्यांपर्यंत असली तरी १२ व्या माजल्यानंतर लगेच १४ वा मजला सुरु होतो. यावर आणखी एक पर्याय म्हणजे १३ व्या मजल्याला १२A क्रमांक दिला जातो किंवा त्या मजल्याला M म्हटलं जातं. M यासाठी कारण ‘लॅटीन’ अल्फाबेट मध्ये M हा १३ व्या क्रमांकावर येतो.

स्रोत

मुंबई मध्ये १३ वा मजला वगळण्यामागे काही उदाहरणे दिली जातात. त्यातील एक उदाहरण म्हणजे ‘नरीमन पॉईंट’ जवळील “दि ट्रिडेंट हॉटेल” मध्ये घडलेला प्रकार. या मजल्यावर जे राहिले त्यांना तिथे भुताटकीचा प्रकार दिसून आल्याचं म्हटलं जातं. दुसरं उदाहरण आहे नरीमन पॉईंट जवळीलच आणखी एका हॉटेलात पर्यटकांना आलेला भयानक अनुभव. 

ही अंधश्रद्धा फक्त हॉटेल पुरतीच मर्यादित नाही. ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’च्या इमारतीत सुद्धा १३ वा मजला नाही. त्या ऐवजी १३ व्या मजल्याला S हे नाव दिलं आहे. S चा अर्थ होतो सर्विस रूम.

स्रोत

मंडळी ही अंधश्रद्धा कशी पसरली याबाद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. पण याच्या खुणा सन १९३० पर्यंत मागे जातो. संपूर्ण जगात या प्रकारची अंधश्रद्धा पाहायला मिळते. चीन मध्ये ४, १४ किंवा २४ क्रमांक वगळण्यात येतो कारण चीनी भाषेत ४ क्रमांकाचा उच्चार मरण (Death) असा होतो.

मंडळी भीती सर्वांच्याच मनात असते पण त्या भीतीने आपल्यावर ताबा मिळवला की अशी अंधश्रद्धा तयार होते.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

आधुनिक मुंबईचे खऱ्या अर्थाने शिल्पकार: 'नाना' शंकरशेठ आणि त्यांचं उत्तुंग कार्य
लाइफस्टाइल

आधुनिक मुंबईचे खऱ्या अर्थाने शिल्पकार: 'नाना' शंकरशेठ आणि त्यांचं उत्तुंग कार्य

मुंबईला आधुनिक रूप देणारे द्रष्टे समाजसुधारक जगन्नाथ 'नाना' शंकरशेठ यांच्या बहुमूल्य योगदानाचा घेतलेला ऐतिहासिक आढावा.

३१ जुलै, २०२६

आता पावसाचा सट्टा खेळू या? 'रेन मुंबई' आणि नशिबाचा पाऊस!
लाइफस्टाइल

आता पावसाचा सट्टा खेळू या? 'रेन मुंबई' आणि नशिबाचा पाऊस!

एनसीडीईएक्सने मुंबईतील पावसावर आधारित देशातील पहिला पावसाचा वायदा बाजार सुरू केला आहे. जाणून घ्या हा सट्टा नक्की कसा चालतो.

२ जुलै, २०२६

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ
लाइफस्टाइल

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ

१९५७ मध्ये व्हिक्टोरिया डॉकवर ३०० तोळे सोन्याची तस्करी पकडणारे मुंबई कस्टम्सचे कर्तव्यदक्ष अधिकारी बापू लक्ष्मण लामखडे यांची शौर्यकथा.

२ जुलै, २०२६

मुंबईचे काळीज: व्हिक्टोरिया टर्मिनसच्या ऐतिहासिक प्रवासाला १३९ वर्षे पूर्ण
लाइफस्टाइल

मुंबईचे काळीज: व्हिक्टोरिया टर्मिनसच्या ऐतिहासिक प्रवासाला १३९ वर्षे पूर्ण

बोरीबंदर ते व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आजचे सीएसएमटी; मुंबईच्या या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाचा १३९ वर्षांचा गौरवशाली प्रवास.

२० जून, २०२६

चुरमुऱ्यांच्या दोन राजधान्या: कोलकात्याची झालमुरी की मुंबईची भेळ?
लाइफस्टाइल

चुरमुऱ्यांच्या दोन राजधान्या: कोलकात्याची झालमुरी की मुंबईची भेळ?

कोलकात्याची झणझणीत झालमुरी आणि मुंबईची चटपटीत भेळ; या दोन लोकप्रिय स्ट्रीट फूडचा इतिहास आणि चवींची रंजक तुलना.

११ मे, २०२६