मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

7-Up चा एक घोट आणि थेट 'ब्लॅकआऊट': एका अजब वैद्यकीय लक्षणाचा रंजक तपास

4 मिनिट वाचन

कोल्ड ड्रिंक प्यायल्यावर शुद्ध हरपणाऱ्या एका रुग्णाच्या अजब वैद्यकीय स्थितीमागचे वैज्ञानिक कारण.

शेअर करा:
7-Up चा एक घोट आणि थेट 'ब्लॅकआऊट': एका अजब वैद्यकीय लक्षणाचा रंजक तपास

7-Up चा एक घोट आणि थेट 'ब्लॅकआऊट': एका अजब वैद्यकीय लक्षणाचा रंजक तपासमानवी अन्ननलिकेमध्ये होणाऱ्या आकुंचनाचा वेग आणि तीव्रता काही वेळा इतकी भयानक असू शकते की,त्यामुळे हृदयाचे ठोके क्षणार्धात मंदावून माणूस अवघ्या काही सेकंदात जमिनीवर कोसळू शकतो.हे वाचायला एखाद्या थ्रिलर सिनेमातल्या संवादासारखं वाटत असलं, तरी वैद्यकीय जगतात अशा घटनांना 'न्यूरोकार्डिओजेनिक रिस्पॉन्स' असं म्हटलं जातं.

अमेरिकेतील एका हृदयविकार तज्ज्ञाकडे एक अजब रुग्ण आला. त्याचं म्हणणं साधं पण डोकं चक्रावून टाकणारं होतं. तो म्हणाला, "डॉक्टर, मी जेव्हा जेव्हा 7-Up पितो, तेव्हा मला एकदम हलकं वाटायला लागतं आणि मी शुद्ध हरपून खाली पडतो." आता कोणत्याही सामान्य डॉक्टरने याला 'गॅस झाला असेल' म्हणून एखादं एन्टॅसिड देऊन घरी पाठवलं असतं. पण या डॉक्टरांनी हे प्रकरण तडीस नेण्याचं ठरवलं

डॉक्टरांनी जवळच्या एका गॅस स्टेशनवर जाऊन 7-Upची बाटली विकत घेतली आणि ती कॅथ लॅबमध्ये (Cath Lab) घेऊन आले.रुग्णाला समोर बसवून त्यांनी त्याला ते कोल्ड ड्रिंक प्यायला दिलं. आणि काय आश्चर्य! तो रुग्ण खरोखरच काही क्षणात बेशुद्ध पडला. हे एखाद्या जादूटोण्यासारखं वाटत असलं, तरी त्यामागे एक अतिशय क्लिष्ट शारीरिक प्रक्रिया (complex physiological process) काम करत होती.

त्या रुग्णाला 7-Up ॲलर्जी नव्हती किंवा त्या पेयात काही विषारी घटक नव्हते. मुद्दा होता तो त्यातील 'कार्बोनेशन'चा, म्हणजेच त्यातल्या फसफसणाऱ्या वायूचा. जेव्हा तो रुग्ण 7-Up प्यायचा, तेव्हा त्यातील गॅसमुळे त्याच्या अन्ननलिकेत (Esophagus) तीव्र स्वरूपाचे आकुंचन किंवा 'स्पॅझम' निर्माण व्हायचा.

आपण जेवण झाल्यावर 'ढेकर' येण्यासाठी आवर्जून सोडा किंवा कोल्ड ड्रिंक पितो.पण या रुग्णाच्या बाबतीत हीच गोष्ट त्याच्या जीवावर बेतत होती. अन्ननलिकेत झालेला तो तीव्र स्पॅझम त्याच्या शरीरातील 'वेगस नर्व्ह'ला (Vagus Nerve) उत्तेजित करत होता. ही नर्व्ह थेट हृदयाशी जोडलेली असते. जेव्हा ही नर्व्ह चुकून जास्त सक्रिय होते, तेव्हा ती हृदयाचे ठोके आणि रक्तदाब अचानक कमी करते, ज्याला वैद्यकीय भाषेत 'न्यूरोकार्डिओजेनिक सिंकोप' म्हणतात.(Neurocardiogenic response, or vasovagal syncope)

विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, अन्ननलिकेच्या एका साध्या धक्क्याने मेंदूला वाटलं की शरीरात काहीतरी खूप मोठी गडबड झाली आहे, आणि त्याने संरक्षणासाठी सिस्टिम 'शट डाऊन' केली. आपल्याकडे जसं बिल्डिंगच्या एका विभागात आग लागली की पूर्ण बिल्डिंगची वीज कापली जाते, तसंच काहीसं हे प्रकरण होतं. पण 7-Up प्यायल्यावर कुणी बेशुद्ध कसं पडू शकतं,याचं उत्तर त्या रुग्णाच्या संवेदनशील शरीररचनेत दडलं होतं.

उपचाराचा भाग म्हणून डॉक्टरनी त्याला 'नायट्रेट्स' दिले. आता सामान्यतः नायट्रेट्स हे हृदयविकाराच्या रुग्णांना रक्तवाहिन्या रुंद करण्यासाठी (Vasodilator) दिले जातात. पण इथे त्याचा वापर वेगळ्या कारणासाठी केला गेला. नायट्रेट्समुळे त्या रुग्णाच्या अन्ननलिकेचे स्नायू शिथिल झाले आणि त्याचा स्पॅझम थांबला. परिणामी,7-Up प्यायल्यावर होणारा तो जीवघेणा परिणाम बंद झाला.

हे प्रकरण आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव करून देतं की आपल्या शरीराचं वायरिंग किती गुंतागुंतीचं असतंशरीराच्या या अंतर्गत राजकारणात कोणती ठिणगी कुठे पडेल आणि त्याचा भडका कुठे उडेल, याचा नेम नाही. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही 'थंडा' पिऊन तृप्तीचा ढेकर द्याल, तेव्हा लक्षात ठेवा की तुमची अन्ननलिका आणि हृदय यांच्यात एक छुपी युती सुरू असते. विज्ञानाने दिलेला हा धडा कोणत्याही वैद्यकीय पुस्तकापेक्षा जास्त रंजक आहे, हे मान्य करायलाच हवं.

आपल्या पचनसंस्थेचा एक छोटासा स्नायू थेट हृदयाला 'स्टॉप' सिग्नल म्हणजे 'Alert Mode' असतो.

महत्वाची सूचना: हे वाचून काहीही प्रयोग करायला जाऊ नका.तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या

पुढची गोष्ट
विज्ञानहसणं आवरता का येत नाही? मेंदूतल्या 'त्या' लोचाचं गुपित!गंभीर प्रसंगी हसू का येतं? आपल्या मेंदूत चालणाऱ्या या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमागचं शास्त्रीय कारण जाणून घ्या.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

विसरता न येण्याचं 'वरदान की शाप': काय आहे हा हायपरथायमेशिया?
विज्ञान

विसरता न येण्याचं 'वरदान की शाप': काय आहे हा हायपरथायमेशिया?

आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहणे हे वरदान आहे की शाप? हायपरथायमेशिया या दुर्मिळ वैद्यकीय अवस्थेबद्दल रंजक माहिती.

१ जून, २०२६

कोळशाच्या डांबरातून सॅकरिनचा शोध: एका अपघाताची आणि फसवणुकीची 'कडू' गोष्ट
विज्ञान

कोळशाच्या डांबरातून सॅकरिनचा शोध: एका अपघाताची आणि फसवणुकीची 'कडू' गोष्ट

कोळशाच्या डांबरापासून सॅकरिनचा शोध कसा लागला आणि त्यामागे शास्त्रज्ञांच्या वादाची कोणती 'कडू' कथा आहे, हे जाणून घ्या.

१४ मे, २०२६

विंचवांशी मैत्री करणारा डॉक्टर
आरोग्य

विंचवांशी मैत्री करणारा डॉक्टर

घरात शेकडो विंचू पाळून त्यांच्या विषाने रुग्णांवर उपचार करण्याचा दावा करणारे अफगाणिस्तानचे डॉ. अमीन शिरझाद आणि या उपचारपद्धतीमागील सत्य.

४ ऑक्टोबर, २०२६

जठराची शस्त्रक्रिया केली की डायबेटिस बरा होतो का?
आरोग्य

जठराची शस्त्रक्रिया केली की डायबेटिस बरा होतो का?

वजन कमी होण्याआधीच रक्तातील साखर कशी नियंत्रणात येते? जाणून घ्या रू-एन-वाय गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रियेमागील हार्मोनल विज्ञान.

२४ सप्टेंबर, २०२६