मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

हॉलमार्क म्हणजे नक्की काय ? सोन्याचा कस नक्की कसा पाहतात ?

4 मिनिट वाचन
शेअर करा:
हॉलमार्क म्हणजे नक्की काय ? सोन्याचा कस नक्की कसा पाहतात ?

सोनं किती शुध्द आहे हे नक्की करण्यासाठीची पारंपारीक पध्दत म्हणजे त्याचा कस मोजणे. कस मोजायचा एक दगड सोनाराकडे असतो, त्याला "कसोटी"चा पत्थर असं म्हटलं जातं.  या दगडावर सोन्याचा नग घासला जातो आणि त्यावर अ‍ॅसिडचे काही थेंब टाकले की सोनाराला नग किती कॅरेट सोन्याचा आहे हे कळतं. ही पध्दत पारंपारीक आहे आणि सोनार जितका कसलेला असेल, तितका त्याचा अंदाज बरोबर असतो. थोडक्यात ही कसोटी व्यक्तिसापेक्ष आहे.

स्रोत

काही घरगुती पध्दतीने पण काहीजण  हा प्रयोग करतात. उदाहरणार्थ, एखादा नग व्हिनेगरच्या पाण्यात बुडवून बघणे. जर भेसळ तांबे किंवा जस्त या धातूची असेल, तर व्हिनेगरमधल्या अ‍ॅसिटिक अ‍ॅसिडसोबत प्रक्रिया होऊन निळसर हिरव्या रंगाची झाक येते. पण अशा प्रयोगात तयार नग खराब होण्याची शक्यता जास्त असते. हे "डिस्ट्रक्टीव टेस्टींग" या सदरात मोडते . सोन्याचा कस शोधायला परीक्षणासाठी कमीतकमी नमुना वापरणे ही योग्य पध्दत आहे.इ-बेसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अशी टेस्टिंग किटस् मिळू शकतात. या सगळ्या पध्दतीचा अवलंब म्हणजे कुतुहूल पूर्ण करणे या पलीकडे काहीही नाही. 

स्रोत

हे सर्व उद्योग करण्यापेक्षा मानांकन असलेले दागिने घेणे जास्त श्रेयस्कर  आहे. नाही का ? म्हणूनच  हे प्रमाणिकरण करण्यासाठी बीआयएस -(The Bureau of Indian Standards) ने "हॉलमार्क"पध्दती अंमलात आणली. बीआयएसची स्थापना संसदेच्या Bureau of Indian Standards Act, 1986  (सुधारीत 2016 ) च्या अन्वये झालेली आहे. त्यामुळे बीआयएसला उत्पादन प्रमाणित करणे आणि प्रमाणिकरणाचा आग्रह करण्याचा अधिकार आहे. 

बीआयएसच्या निकषांप्रमाणे "सोने आणि सोन्यापासून बनवलेली उत्पादने " प्रमाणित करणं आता अनिवार्य आहे. हे जरी खरे असले, तरीही सर्वच सोनार किंवा पेढ्या हॉलमार्कचे दागिने बनवत नाहीत. पण हळूहळू सरकारी आग्रह (सक्ति?) आणि ग्राहकांची इच्छा या दोन्हीमुळे हॉलमार्क असलेले दागीने सर्वत्र मिळतील. 

स्रोत

आता प्रश्न असा आहे की हे दागिने हॉलमार्क असलेले आहेत अथवा नाहीत हे कसे ओळखायचे ? 

हॉलमार्कच्या नगावर पाच चिन्हे असातात

१. बीआयएसचा लोगो 
२. कॅरेटचा आकडा (उदाहरणार्थ:२२़़K  वगैरे )
३. अ‍ॅसे (परीक्षण) करणार्‍या संस्थेचे चिन्ह ४ घडणावळीचे  वर्ष 
५.  सोनार किंवा पेढीचा लोगो. 

स्रोत

कालच्या भागात आपण बघीतलेच आहे की केडीएम दागिन्यांवर आता बंदी आहे.  पण मानांकन लिहिताना अजूनही केडीएम असे शब्द लिहिण्याची परवानगी आहे. फक्त इथे केडीएमचा अर्थ कॅडीमीयम खेरीज इतर धातूंचा वापर डाग देण्यासाठी वापरला आहे असा अर्थ घ्यावा. बीआयएसच्या नव्या २०१७ च्या नियमावलीप्रमाणे आता एकूण तीन वेगवेगळ्या कॅरेटला मानांकन देता येते. १४K, १८K आणि २२K  हे ते तीन प्रकार आहेत. 

आता आपण एका कठीण प्रश्नाला सामोरे जाऊ या. आपल्या सगळ्यांना ही कल्पना आहे की  भारतात खाणीमधून नाममात्र सोनं मिळतं. पण भारतातल्या जनतेची सोन्याची भूक वाढतच जाते आहे.  मग हे सोनं येते कुठून ?  नवनवीन दागीने येतात तरी कसे ? 

स्रोत

बरेचसे दागिने जुनं सोनं मोडून तयार होतात आणि बाकी सर्व सोनं बाहेरच्या देशातून आपल्याकडे येत असतं. असं असेल तर या बाहेरून आलेल्या सोन्याची प्रत कशी ओळखायची ?

आपल्याकडे हॉलमार्कींग फार उशिरा आले, बाहेरच्या जगात म्हणजे युरोपात, आफ्रीकेत, अमेरिकेत हॉलमार्कींग पध्दती फार जुन्या आहेत. सोन्याच्या बिस्कीटावर जे मार्कींग दिसते ते त्या-त्या देशाच्या हॉलमार्कींग पध्दतीचे असते. युरोपमध्ये हॉलमार्कींग इ.१२०० पासून अंमलात आणली गेली आहे. अमेरिकेत १०K च्या सोन्याचेपण हॉलमार्कींग करावे लागते. 

ग्राहकाला शुध्द सोने मिळावे म्हणून हॉलमार्कींगचा उपयोग होतो हे  खरं आहे.  पण सोन्याच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात सुध्दा  फसवणूक होत असते. त्या गमतीदार कथा नंतरच्या येणार्‍या भागात आपण वाचूच.. पण आता इतकेच लक्षात ठेवू या की मध्यरात्री पैसे उभे करायचा सोनं हा एकच मार्ग नाही. गरीबाघरची शेळी पण मध्यरात्री मो देऊन जाते. म्हणून जाता जाता एक वाक्प्रचार सांगतो आहोत . 

Gold for rich and Goat for poor !!!

 

आणखी वाचा :

२४ कॅरेट सोनं म्हणजे काय ? KDM चे दागिने म्हणजे काय ? राव, तुम्हाला सोन्याबद्दल किती माहित आहे ?

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलसोन्याचं नाणं, डिजिटल गोल्ड की गोल्ड ETF: फरक काय?सोन्याचं नाणं, ॲपवरचं डिजिटल गोल्ड आणि शेअर बाजारातला गोल्ड ETF: GST, इतर खर्च, साठवणूक, विक्री आणि SEBI नियमन यातला फरक, एका तुलनात्मक तक्त्यासह.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

सोन्याच्या खाणी, तरीही गरीब: बुर्कीना फासो देशाची कहाणी
लाइफस्टाइल

सोन्याच्या खाणी, तरीही गरीब: बुर्कीना फासो देशाची कहाणी

या देशाचे उत्पन्न दोन प्रकारच्या सोन्यावर अवलंबून आहे: खाणीतले सोने आणि कापूस. तरीही ५०% हून अधिक जनता दारिद्र्य रेषेखाली जगते आहे.

३० ऑक्टोबर, २०२६

१६ किलोचे सोन्याचे झुमके; याला झुमका म्हणावं की झुंबर ते तुम्हीच ठरवा!
लाइफस्टाइल

१६ किलोचे सोन्याचे झुमके; याला झुमका म्हणावं की झुंबर ते तुम्हीच ठरवा!

जोयअलुक्कास या भारतीय कंपनीने दुबईत १६ किलोहून अधिक वजनाच्या सोन्याच्या भव्य झुमक्यांची निर्मिती केली आहे. ‘मयूर सहस्र’ असे नाव असलेले हे झुमके २२ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आले आहेत.

२९ ऑक्टोबर, २०२६

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?
लाइफस्टाइल

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?

भारतीयांच्या सोन्यावर बंदी घालणाऱ्या १९६८ च्या गोल्ड कंट्रोल ॲक्टचा अजब इतिहास आणि त्यामुळे सुरू झालेली तस्करी.

१७ ऑगस्ट, २०२६

गोव्यातील ५,५८४ कुटुंबांच्या सोन्याची ३० वर्षांची 'कैद'; आजच्याच दिवशी परतला तो खजिना!
लाइफस्टाइल

गोव्यातील ५,५८४ कुटुंबांच्या सोन्याची ३० वर्षांची 'कैद'; आजच्याच दिवशी परतला तो खजिना!

पोर्तुगीजांनी पळवून नेलेले गोवेकरांचे ५,५८४ दागिन्यांची पाकिटे ३० वर्षांच्या मुत्सद्देगिरीनंतर ३ ऑगस्ट १९९१ रोजी भारतात परत आली.

३ ऑगस्ट, २०२६

कपाटातून क्लाउडपर्यंत: सोन्याच्या गुंतवणुकीचा नवा इलेक्ट्रॉनिक अवतार
लाइफस्टाइल

कपाटातून क्लाउडपर्यंत: सोन्याच्या गुंतवणुकीचा नवा इलेक्ट्रॉनिक अवतार

सोन्याच्या गुंतवणुकीचा नवा मार्ग: इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) म्हणजे काय आणि ते डिजिटल युगात कसे फायदेशीर आहे, याबद्दलची माहिती.

१० मे, २०२६