मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

वय फक्त ६ वर्ष पण कमाई ७१ कोटी....जाणून घ्या कोण आहे हा मुलगा !!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
वय फक्त ६ वर्ष पण कमाई ७१ कोटी....जाणून घ्या कोण आहे हा मुलगा !!!

या लहानग्याने जे केलंय ते आपल्यातील कोणीच या वयात केलं नसेल राव.या मुलाचं नाव आहे रायन. रायन हा ‘Ryan ToysReview’ या युट्युब चॅनेलचा मालक आहे. या चॅनेल मधून तो लहान मुलांच्या खेळण्यांचा रिव्ह्यू देतो म्हणजे त्यांच्या बद्दल लोकांना माहिती देत असतो आणि आश्चर्य म्हणजे हे रिव्ह्यू इतके प्रसिद्ध आहेत की रायनने एका वर्षात तब्बल ११ मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. भारतीय चालानाप्रमाणे जवळ जवळ ७१ कोटी रुपये.

धक्का बसला ना ? मंडळी रायनचं वय फक्त ६ वर्ष आहे. त्याचं वय बघता हे नक्कीच आश्चर्यकारक आहे. त्याच्या या अद्भुत कमाईमुळे त्याने फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवलंय. फोर्ब्सची ही यादी खास करून युट्युब मधून सर्वात जास्त कमाई करणाऱ्या युट्युबरसाठी असते. या लिस्ट मध्ये रायन ९ व्या स्थानावर आहे. 

२०१५ पासून रायन युट्युबवर आपल्या व्हिडीओजच्या माध्यमातून लोकांना आपले रिव्ह्यू देत असतो. त्यावेळी त्याचं वय अवघं ४ वर्ष होतं. जुलै २०१५ रोजी आलेल्या ‘जायंट एग सरप्राईज’ या रिव्ह्यूमुळे त्याला रातोरात प्रसिद्धी मिळाली. ८० कोटी पेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडीओ बघितला आणि शेअर केला. इथूनच रायनची गाडी पळू लागली.

रायन खेळण्यांबरोबरच लहान मुलांच्या फूड प्रोडक्ट्स बद्दलही माहिती देत असतो. रायनच्या या यशामध्ये त्याच्या आई वडिलांचाही तेवढाच मोठा हात आहे हे विसरून चालणार नाही !!

संबंधित लेख