मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

शहरांची बदलती ओळख: टायर-१ आणि टायर-२ शहरे म्हणजे काय?

4 मिनिट वाचन

मुंबई, पुणे ही शहरे टायर-१ मध्ये का येतात? शहरांचे हे वर्गीकरण नक्की कसे केले जाते आणि त्याचे निकष काय असतात, हे जाणून घ्या.

शेअर करा:
शहरांची बदलती ओळख: टायर-१ आणि टायर-२ शहरे म्हणजे काय?

भारतात शहरांचे वर्गीकरण प्रामुख्याने लोकसंख्या,आर्थिक उलाढाल आणि पायाभूत सुविधांच्या आधारावर केले जाते. 'टायर-१' (Tier-1) शहरे म्हणजे अशी महानगरे जिथे विकासाचा उच्चांक गाठला गेला आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि अहमदाबाद ही सध्याची आठ प्रमुख टायर-१ शहरे आहेत. या शहरांमध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

दुसरीकडे, 'टायर-२' (Tier-2) शहरे ही वेगाने विकसित होणारी मध्यम आकाराची शहरे आहेत. जयपूर, लखनौ, सुरत, इंदूर आणि नागपूर यांसारखी शहरे या श्रेणीत येतात. इथे राहण्याचा खर्च टायर-१ शहरांच्या तुलनेत कमी असतो, पण विकासाचा वेग मात्र थक्क करणारा असतो.

(महत्वाची नोंद : टायर-१ आणि टायर-२ या शब्दांचा वापर टीयर - १/ टीयर-२ असाही केला जातो)

हे वर्गीकरण नक्की कोण ठरवतं? शहरांना कोणत्या गटामध्ये टाकायचे,याचे कोणतेही एकच अधिकृत सूत्र नाही, वेगवेगळ्या संस्था त्यांच्या गरजेनुसार हे ठरवतात:

१. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आरबीआय लोकसंख्येच्या घनतेनुसार शहरांचे ६ स्तरांत वर्गीकरण करते.

२.सातवा वेतन आयोग (7th Pay Commission):सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (HRA) ठरवण्यासाठी शहरांना X, Y आणि Z अशा तीन श्रेणींत विभागले जाते. 'X' श्रेणीतील शहरे म्हणजे टायर-१, तर 'Y' श्रेणी म्हणजे टायर-२.

३.रिअल इस्टेट आणि गुंतवणूक संस्था:अनेक खाजगी संस्था शहरांमधील आयटी पार्क्स, विमानतळ आणि कनेक्टिव्हिटी पाहून त्यांचे मानांकन ठरवतात.

येत्या २५ वर्षांत 'टायर-१' होऊ शकतील अशी शहरे

इतिहास दाखवतो की, शहरांची गर्दी जेव्हा मर्यादेबाहेर जाते, तेव्हा भांडवल आणि माणसे पर्यायी शहरांकडे वळतात. आजकाल मात्र हा ओघ इतका वेगवान आहे की, पुढच्या २५ वर्षांत अनेक टायर-२ शहरे टायर-१ च्या पंक्तीत जाऊन बसतील. यामध्ये प्रामुख्याने खालील शहरांचा समावेश होतो:

  • सुरत आणि अहमदाबाद-गुजरात मधील ही शहरे आधीच आर्थिक केंद्र बनली आहेत. हिरे उद्योग आणि टेक्स्टाईल सोबतच आता इथे सेमीकंडक्टर आणि आयटी क्षेत्र पाय रोवत आहे.
  • पुणे- पुणे अनेकदा,खरे म्हणजे वेळेआधीच, टायर-१ मध्ये गणले जाते,त्याचा विस्तार पाहता ते मुंबईच्या तोडीचे जागतिक शहर बनण्याच्या मार्गावर आहे.

*लखनौ आणि इंदूर-उत्तर आणि मध्य भारतातील ही शहरे आता केवळ सांस्कृतिक केंद्र राहिलेली नाहीत. इथली स्टार्टअप संस्कृती आणि स्वच्छता मोहिमेतील यश गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे.

*कोइम्बतूर आणि विशाखापट्टणम-दक्षिण भारतातील ही शहरे मॅन्युफॅक्चरिंग आणि लॉजिस्टिक हब म्हणून वेगाने पुढे येत आहेत.

बदलता पॅटर्न आणि महाराष्ट्राचा संदर्भ- आपल्या महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या दोन इंजिनांनी राज्याला गती दिली. पण आता नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या शहरांकडे वेगळ्या नजरेने पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते—इथे होणारे समृद्धी महामार्ग आणि मेट्रोचे जाळे या शहरांना टायर-१ च्या दिशेने ढकलत आहे. सणासुदीला जेव्हा चाकरमानी या शहरांकडे परततात, तेव्हा त्यांना तिथे दिसणारे मॉल्स आणि रुंद रस्ते हे बदलत्या भारताचे प्रतिबिंब असतात.

मनोरंजक गोष्ट म्हणजे, तंत्रज्ञानामुळे आता 'वर्क फ्रॉम होम' सारख्या पर्यायांनी छोट्या शहरांमधील क्रयशक्ती वाढवली आहे. यामुळे शहरांच्या व्याख्या केवळ सरकारी कागदावर न राहता, लोकांच्या जीवनशैलीतून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

एखाद्या शहराचे टायर स्टँडर्ड बदलणे म्हणजे केवळ तिथल्या जमिनीचे भाव वाढणे नसते, तर त्या मातीशी जोडलेल्या हजारो स्वप्नांना नवी दिशा मिळणे असते. शहरांची ही शर्यत कधी संपणारी नाही, पण या शर्यतीत धावताना त्या शहराचा मूळ आत्मा टिकून राहतो का, हाच खरा निरीक्षणाचा विषय आहे.

पुढच्या दशकात जेव्हा एखादे शहर टायर-२ मधून टायर-१ मध्ये जाईल, तेव्हा तिथल्या पायाभूत सुविधांसोबतच तिथल्या माणसांची मानसिकताही तितकीच प्रगल्भ झालेली असेल का?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

चाकू-कात्री न वापरता मेंदूची शस्त्रक्रिया! 'गॅमा नाईफ'चा चमत्कार समजून घ्या!
आरोग्य

चाकू-कात्री न वापरता मेंदूची शस्त्रक्रिया! 'गॅमा नाईफ'चा चमत्कार समजून घ्या!

कवटी न फोडता आणि टाके न घालता मेंदूतील गाठींवर अचूक उपचार करणारे 'गॅमा नाईफ' रेडिएशन तंत्रज्ञान नेमके कसे कार्य करते?

९ सप्टेंबर, २०२६

ज्यू लोकांच्या श्रीमंतीचं ते एक 'गुपित'; जे आपल्या मराठी माणसाला अजून उमजलेलं नाही!
लाइफस्टाइल

ज्यू लोकांच्या श्रीमंतीचं ते एक 'गुपित'; जे आपल्या मराठी माणसाला अजून उमजलेलं नाही!

ज्यू समाजाच्या आर्थिक यशामागे असलेली 'फार्गिन' ही संकल्पना आणि दुसऱ्याच्या यशात आनंद मानण्याची वृत्ती.

९ मार्च, २०२६

३४ कोटींचा 'ब्लड मनी' आणि २० वर्षांचा वनवास; अब्दुल रहीम अखेर मायदेशी परतला!
लाइफस्टाइल

३४ कोटींचा 'ब्लड मनी' आणि २० वर्षांचा वनवास; अब्दुल रहीम अखेर मायदेशी परतला!

सौदी अरेबियात फाशीची शिक्षा सुनावलेल्या अब्दुल रहीमची ३४ कोटींच्या 'ब्लड मनी'मुळे सुटका झाली. माणुसकीच्या या अभूतपूर्व गोष्टीचा आढावा.

२९ मे, २०२६

जगाच्या नजरेआड राहून कोट्यवधी कमावणाऱ्या अवलियांची गोष्ट: अननोन मार्केट विझार्ड्स
लाइफस्टाइल

जगाच्या नजरेआड राहून कोट्यवधी कमावणाऱ्या अवलियांची गोष्ट: अननोन मार्केट विझार्ड्स

शेअर बाजारात शांतपणे कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या सामान्य ट्रेडर्सच्या यशोगाथा सांगणाऱ्या पुस्तकाचा आढावा.

९ मार्च, २०२६