मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

बायकोनं आपल्याच जुन्या फोटोवरून नवऱ्यावर संशय घेतला? नक्की काय प्रकरण आहे हे?

3 मिनिट वाचन
शेअर करा:
बायकोनं आपल्याच जुन्या फोटोवरून नवऱ्यावर संशय घेतला? नक्की काय प्रकरण आहे हे?

मध्यंतरी एक विनोद व्हायरल झाला होता तो असा होता.. 'आपण देवाला अनेकदा फसवू शकतो, पण देव खूपच दयाळू असतो कारण प्रत्येक फसवणूकीबद्दल तो आपल्याला शिक्षा देत नाही. तो एकदाच लग्न लावून देतो. आता बसा बोंबलत…,'

लग्न म्हणजे शिक्षा अश्या आशयाचे अनेक विनोद होत असतात. मस्करी म्हणून ते वाचायला गंमतही वाटते. पण बायकोमुळे खरंच बोंबलण्याची वेळ मेक्सिकोमध्ये एका नवऱ्याला आली आहे. नक्की काय झालं असेल?

बायकोनं आपल्याच जुन्या फोटोवरून नवऱ्यावर संशय घेतला? नक्की काय प्रकरण आहे हे? – चित्र 1

मेक्सिकोच्या सोनोरामध्ये जुआन आणि लिओनोरा या नवरबायकोचं जोरदार भांडण झालं. लिओनोराला संशय आला की तिचा नवरा जुआन अजून कुठल्यातरी तरुण बाईबरोबर लफडं करतोय. तिला त्याचे आणि अजून एका तरुणीचे फोटो त्याच्या फोनवर सापडतात. या गोष्टीवरून वाद इतका विकोपाला जातो की लिओनोरा चाकू उगारते आणि नवऱ्यावर हल्ला करते. जुआन ते बघून घाबरतो आणि स्वतःचा जीव वाचवत पळू लागतो. तो बिचारा परोपरीने तिला सांगतो की समजावण्याची एक तरी संधी दे. पण या बाईच्या डोक्यात संशयाचं भूत असं काही बसलं असतं की ती काहीएक ऐकून घेत नाही. शेवटी त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांना हे भांडण काहीतरी भलतंच आहे हे कळतं. शेजारी लगेच पोलिसांना फोन करतात. तोपर्यंत जुआन बायकोच्या हातातून चाकू मिळवण्यात यशस्वी होतो आणि सुरक्षित होतो. 

बायकोनं आपल्याच जुन्या फोटोवरून नवऱ्यावर संशय घेतला? नक्की काय प्रकरण आहे हे? – चित्र 2

लिओनोरा आपला नवरा कसा फसवतोय याची कैफियत पोलिसांसमोर मांडते. पोलीस जुआनचा फोन घेऊन सत्याचा शोध सुरू करतात. इथपर्यंत ठीक आहे पण पोलिसांना जेव्हा खरं काय झालंय ते कळतं ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल. जेव्हा ते फोटो नीट पाहिले गेले तेव्हा लक्षात आलं की ते जुआन आणि लिओनोरा यांचेच जुने फोटो होते. जुआनने ते फिल्मच्या कॅमेऱ्यातून घेतले होते आणि डिजिटल करून फोनमध्ये सेव्ह करून ठेवले होते. लग्नाआधी डेटिंग साठी ते भेटायचे तेव्हाचे ते फोटो होते. लिओनोराला दाखवल्यावर तिनेही कबूल केले की तिने स्वतःचे जुने फोटो ओळखले नाही. तेव्हा ती खूप बारीक आणि मेकअपमध्ये होती म्हणे. काय म्हणावं आता या बाईला? 

 जुआन भाऊ त्याच्या नशिबाने वाचला पण त्याच्या हातापयावर चाकूने मारलेल्या खुणा आढळल्या आहेत. अर्थातच लिओनोराला पोलिसांनी त्वरित अटक केली. प्रेम हे आंधळं असतं म्हणतात पण संशय तर आंधळा, बहिरा, मुकाही असतो असंच म्हणलं पाहिजे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट
लाइफस्टाइल

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट

बोलण्याने हत्ती मिळवता येतो आणि बोलण्यानेच हत्ती गमावताही येतो. अवधच्या नवाबांच्या काळातली, बोलण्याच्या कलेची ताकद सांगणारी एक सुरेख गोष्ट.

२ नोव्हेंबर, २०२६

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा
लाइफस्टाइल

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा

फाळणीच्या विस्थापनानंतर ५ हजार रुपयांच्या बचतीवर जागतिक स्तरावर शाही एक्स्पोर्ट्सची निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक सरला आहुजा यांची प्रेरक गोष्ट.

२८ सप्टेंबर, २०२६

'सेल्फ-केअर'च्या नावाखाली तुम्ही स्वतःला कमकुवत बनवताय? 'टफ लव्ह'चा मंत्र
लाइफस्टाइल

'सेल्फ-केअर'च्या नावाखाली तुम्ही स्वतःला कमकुवत बनवताय? 'टफ लव्ह'चा मंत्र

स्वतःचे लाड करण्याऐवजी स्वतःशी शिस्तबद्ध व कठोर राहणे म्हणजेच 'टफ लव्ह' मेंदू आणि यशासाठी कसे फायदेशीर ठरते, याविषयी.

८ ऑगस्ट, २०२६

स्वतःचं भलं करा, तरच पुढची पिढी सुधारेल: तुकोबांचा प्रॅक्टिकल सल्ला
लाइफस्टाइल

स्वतःचं भलं करा, तरच पुढची पिढी सुधारेल: तुकोबांचा प्रॅक्टिकल सल्ला

तुकाराम महाराजांच्या अभंगातून आजच्या कॉर्पोरेट युगातील पालकांसाठी आणि तरुणांसाठी एक महत्त्वाचा जीवनपाठ.

२ जून, २०२६

ज्या भारतीय नळाने युरोप आणि जपानची तहान भागवली, त्याचा रंजक इतिहास!
लाइफस्टाइल

ज्या भारतीय नळाने युरोप आणि जपानची तहान भागवली, त्याचा रंजक इतिहास!

केरळच्या जे. पी. सुब्रह्मण्य अय्यर यांनी बनवलेल्या 'वेस्ट नॉट' नळाने जगभरात पाण्याचा अपव्यय कसा रोखला? वाचा एका भारतीय बुद्धिमत्तेची जागतिक कथा.

२० मे, २०२६

एव्हरेस्ट म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी? जुन्को ताबेई यांनी मोडीत काढलेला तो अहंकार!
लाइफस्टाइल

एव्हरेस्ट म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी? जुन्को ताबेई यांनी मोडीत काढलेला तो अहंकार!

जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला जुन्को ताबेई यांचा जिद्दीचा आणि संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास.

१६ मे, २०२६