मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

भेटा जगातल्या सर्वात लहान आकाराच्या गायीला...एवढ्या लहान आकाराची गाय तुम्ही कधी पाहिली आहे का?

2 मिनिट वाचन
शेअर करा:
भेटा जगातल्या सर्वात लहान आकाराच्या गायीला...एवढ्या लहान आकाराची गाय तुम्ही कधी पाहिली आहे का?

गायीचे प्रत्येकाच्या मनात एक चित्र असते. देशभर अनेक जातींच्या गायी आहेत. काहींची उंची जास्त असते, तर काहींची मध्यम. पण आज आम्ही ज्या गायीची माहिती सांगणार आहोत, ती वाचून तुम्हाला पण आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

बांगलादेशातील ढाका जवळील चारीग्राम येथे राणी नावाची एक गाय आहे. सध्या तिच्याबद्दल जगभर कुतूहल आहे. ढाक्याला जाणारे पर्यटकही खास करून या गायीला बघायला जात आहेत. आता तुम्ही म्हणाल की या गायीमध्ये काय खास आहे. तर, या गायीचे वैशिष्ट्य म्हणजे ही गाय फक्त ५१ सेंटीमीटर इतक्या उंचीची आहे तर तिचे वजन हे या अवघे २६ किलो आहे. 

भेटा जगातल्या सर्वात लहान आकाराच्या गायीला...एवढ्या लहान आकाराची गाय तुम्ही कधी पाहिली आहे का? – चित्र 1

राणी नावाची ही गाय जगातील सर्वात लहान आकाराची गाय असल्याचे बोलले जात आहे. याच कारणाने बांगलादेशात लॉकडाऊन असूनही लोकांची या गायीला पाहण्यासाठी झुंबड उडत आहे. या गायीची निगा राखणारे हसन हवालदार यांच्यामते दूरवरून लोक या गायीला पाहण्यासाठी येत आहेत. तब्बल १५,००० लोक या गायीला बघून गेले आहेत. ते सांगतात की, 'लोकांच्या या गर्दीला आम्ही पण त्रासलो आहोत.'

या गावाच्या आजूबाजूला असलेले लोक पण सांगतात की अशी गाय आम्ही आजवर पाहिलेली नाही. राणी ही गाय मूळ भूतानची असून तिला बंगालमधून बांगलादेशात नेण्यात आले आहे. या गायीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने पण घेतली आहे. ही गाय जगातली सर्वात लहान गाय आहे या दाव्याची तपासणी करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी येणार आहेत.

भेटा जगातल्या सर्वात लहान आकाराच्या गायीला...एवढ्या लहान आकाराची गाय तुम्ही कधी पाहिली आहे का? – चित्र 2

या गायीवर लोकांनी मात्र प्रेमाचा वर्षाव केला आहे. अतिशय सुंदर वाटणारी ही गाय पाहण्यासाठी म्हणूनच गर्दी होत आहे. तर सोशल मिडीयावरही या गायीचे फोटो व्हायरल होत आहेत.

 

तुम्हाला कशी वाटली ही गाय? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा!

 

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६

५ किलोमीटर लांब तिरंगा आणि दोन जागतिक विक्रम; हरयाणाने रचला इतिहास!
लाइफस्टाइल

५ किलोमीटर लांब तिरंगा आणि दोन जागतिक विक्रम; हरयाणाने रचला इतिहास!

पलवलमध्ये ५ किलोमीटर लांब तिरंगा पदयात्रेचे आयोजन करून हरयाणाने एकाच दिवशी दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स नोंदवले.

१७ ऑगस्ट, २०२६

इतिहासाची जिवंत कवाडं: म्युझियमची संकल्पना कशी जन्माला आली?
लाइफस्टाइल

इतिहासाची जिवंत कवाडं: म्युझियमची संकल्पना कशी जन्माला आली?

मेसोपोटेमियातील पहिल्या संग्रहालयापासून ते आजच्या आधुनिक म्युझियम्सपर्यंतचा रंजक प्रवास आणि त्याचे महत्त्व.

५ ऑगस्ट, २०२६

जगातील सर्वात 'कुरूप' बूट, ज्याने उभा केला अब्जावधींचा ब्रँड: क्रॉक्सची अजब यशोगाथा
लाइफस्टाइल

जगातील सर्वात 'कुरूप' बूट, ज्याने उभा केला अब्जावधींचा ब्रँड: क्रॉक्सची अजब यशोगाथा

सुरुवातीला फॅशनचा अपमान ठरवून हिणवल्या गेलेल्या क्रॉक्सने स्वतःच्या बेढबपणालाच ताकद बनवत अब्जावधी डॉलर्सचे साम्राज्य कसे उभे केले?

२४ जुलै, २०२६

भाषेचे राजकारण: 'या' १० भाषा जगावर राज्य करतायत!
लाइफस्टाइल

भाषेचे राजकारण: 'या' १० भाषा जगावर राज्य करतायत!

जगातील ७००० भाषांपैकी अर्धी लोकसंख्या फक्त १० भाषा बोलते. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून भूराजकीय वर्चस्वाचे शस्त्र कशी बनते, जाणून घ्या.

२२ जुलै, २०२६