२१ जुलै १९६९ रोजी अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.त्यानंतर तीन महिन्यांनी, 26 ऑक्टोबर 1969 ला ते भारत दौर्यात मुंबई भेटीला आले मुंबईत त्यांच्या स्वागतासाठी २०,००० हून अधिक लोकांनी जमून या प्रसिद्ध अंतराळवीरांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पी. व्ही. चेरियन यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला जाण्यासाठी ओपन कारमध्ये प्रवास केला.ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, माहिम, प्रभादेवी, हाजीअली, केंप्स कॉर्नर आणि चौपाटी मार्गे जात असताना, रस्त्यांच्या कडेला उभे असलेले पुरुष, महिला आणि मुले आनंदाने जयघोष करत हात हलवत होते, तर अंतराळवीरही उत्साहाने प्रतिसाद देत होते.यानंतर त्यांना आझाद मैदानावरच्या भव्य सार्वजनिक स्वागत समारंभाला सुमारे ५ लाख मुंबईकर उपस्थित होते. दिवसाच्या शेवटी त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) येथे भेट दिली आणि भारतातील अग्रगण्य शास्त्रज्ञांशी संवाद साधला.त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष विक्रम साराभाई यांनी नील आर्मस्ट्राँग यांना हत्तीच्या कोरीव मूर्तीची भेट दिली.
चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर जेव्हा नील आर्मस्ट्राँग मुंबईत आले होते!
२१ जुलै १९६९ रोजी चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्यानंतर तीन महिन्यांनी, नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन मुंबई भेटीला आले होते. त्यांच्या स्वागतासाठी आझाद मैदानावर सुमारे ५ लाख मुंबईकर उपस्थित होते.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!
ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.
संबंधित लेख

मुंबईचे काळीज: व्हिक्टोरिया टर्मिनसच्या ऐतिहासिक प्रवासाला १३९ वर्षे पूर्ण
बोरीबंदर ते व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आजचे सीएसएमटी; मुंबईच्या या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाचा १३९ वर्षांचा गौरवशाली प्रवास.
२० जून, २०२६

चुरमुऱ्यांच्या दोन राजधान्या: कोलकात्याची झालमुरी की मुंबईची भेळ?
कोलकात्याची झणझणीत झालमुरी आणि मुंबईची चटपटीत भेळ; या दोन लोकप्रिय स्ट्रीट फूडचा इतिहास आणि चवींची रंजक तुलना.
११ मे, २०२६

मुंबईची होळी 'वन-डे' का? आणि मध्यप्रदेशातील 'रंग तेरस'चं गुपित काय?
मुंबईची धावपळीची होळी आणि नाशिक-मध्यप्रदेशातील 'रंग तेरस'ची अनोखी परंपरा; जाणून घ्या रंगांच्या या विविध उत्सवामागची रंजक माहिती.
१७ मार्च, २०२६

३ दशलक्ष डॉलरचा पुरस्कार आणि साधेपणाची वाट! अशोक सेन यांची कहाणी
जगातील नामवंत भौतिकशास्त्रज्ञांच्या मांदियाळीत स्थान, संशोधनासाठी लाखो डॉलरचा पुरस्कार आणि आता प्रतिष्ठेचे ऑस्कर क्लाइन पदक! तरीही प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणाऱ्या अशोक सेन यांची ही विलक्षण कहाणी.
२ नोव्हेंबर, २०२६

जगावर राज्य करणारी 'पेपल माफिया': १३ लोकांनी कसं बदललं इंटरनेट?
सिलिकॉन व्हॅलीमधील केवळ १३ लोकांच्या कंपन्यांची एकूण किंमत ३ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. ही ताकद आहे 'पेपल माफिया'ची, ज्यांनी गेल्या दोन दशकांत इंटरनेटचं पूर्ण स्वरूपच बदलून टाकलं आहे.
२८ ऑक्टोबर, २०२६

पुन्हा एकदा मिशन 'चांदोबा': नासाचं ऐतिहासिक 'आर्टेमिस' उड्डाण आणि आपलं अवकाश-पुराण
५० वर्षांनंतर नासाच्या 'आर्टेमिस' मोहिमेद्वारे मानव पुन्हा चंद्राला गवसणी घालणार आहे. या ऐतिहासिक प्रवासाविषयी सविस्तर माहिती.
२ एप्रिल, २०२६

